विचारांचे व्यवस्थापन - वस्तुस्थिती की पूर्वग्रह

दैनंदिन जीवनात आपल्या मनात सर्व प्रकारचे बरेवाईट विचार येऊन जातात. परंतु त्या सर्व विचारांचा संबंध सत्याशी कमी असतो. कारण लहानपणापासून ज्या ज्या गोष्टी आपल्या मेंदूत शिरतात, त्यांचा आपल्या दृष्टीकोनावर प्रभाव असतो.

त्यामुळे स्वतःच्या विचारांपासून सावध राहणे गरजेचे असते.